सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रं ८५ व ८६ मध्ये रॅलीचे शुक्रवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सारसोळे येथील श्रीगणेश मंदिरापासून वेशीमाता मंदिर येथून या रॅलीस सांयकाळी ६ वाजता सुरूवात होणार असून माजी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात येणार आहे. सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा, कुकशेत गाव यादरम्यान ही रॅली काढण्यात येणार असून नगरसेवक सुरज पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्यासह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहे.
नेरूळ पश्चिमला या दोन प्रभागातून भाजपला अन्य प्रभागाच्या तुलनेत विक्रमी मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन नगरसेवकांचा जनसंपर्क, भाजपच्या प्रदीप बुरकुलांसह भाजप कार्यकर्त्यांनी घरटी प्रचारात मुसंडी मारली आहे. शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, शिवसेनेची रणरागिनी समुद्रा पाटील, शाखाप्रमुख मनोज तांडेल, इमरान नाईक, युवा सेनेचे अजित खताळ यांनीही शिवसेनेकडून घरटी प्रचार करत मंदाताई म्हात्रेंसाठी जोरदार अभियान राबविले आहे. कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी सारसोळे गावात व सेक्टर सहामध्ये मंदाताई म्हात्रेंचा प्रचार सुरू केला आहे. आमदार मंदाताई म्हात्रेंनी विधान परिषदेवर असताना जेटीसाठी केलेली मदत व काही दिवसापुर्वीच जेटीच्या कामासाठी केलेले कार्य तसेच नारळी पौर्णिमा व बामणदेवाच्या भंडाऱ्यात आमदार मंदाताई म्हात्रेंची आर्वजून उपस्थिती यामुळे सारसोळे गावातून एकगठ्ठा मंदाताईंना मतदान होण्याची आशावाद सेना-भाजपकडून व्यक्त केला जात आहे.