सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
लोकनेते गणेश नाईक यांची विजयाच्या दिशेने कूच
नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईक यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि सामाजिक एकोपा जपणारे असे आहे. समाजातील सर्व घटकांचे हित त्यांनी साधण्याचा आजवर यशस्वी प्रयत्न केला असल्याने ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढत असताना सर्व स्तरातून पाठिंब्याचा ओघ त्यांच्यासाठी सुरु आहे.
नवी मुंबई रिक्षा-टॅक्सी संघटना संयुक्त कृती समिती
रिक्षा चालक आणि मालक हा कष्टकरी वर्ग. या रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकनेेते नाईक यांनी नेहमीच सक्रीय पुढाकार घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भरत नाईक आणि संस्थापक मारुती कोंडे तसेच कार्यकारिणीने दिली आहे. या घटकाप्रती ते नेहमी जिव्हाळा आणि प्रेम बाळगून असतात. याची जाणीव ठेवून नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीने लोकनेते नाईक यांना पाठिंबा दर्शविला आहे.
भारतीय बंजारा सेवा संस्था
विकासाला साथ देण्याचा नारा देत भारतीय बंजारा सेवा संस्थेेने भारतीय जनता पक्ष आणि नवी मुंबईची प्रगती साधणारे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांना जाहीर पाठिंबा दिला असून आमच्या बंजारा समाजाचे सर्व सदस्य त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील, असे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष हिरामण(राठोड)नाईक तसेच सचिव चंदर राठोड यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई बक्कर कसाब जमात आणि कुरेशी समाज
नवी मुंबई बक्कर कसाब जमात आणि कुरेशी समाजाने देखील लोकनेते नाईक यांना समर्थन दिले असून ते भारी मताधिक्क्यांनी जिंकून येतील, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष हाजी गणी, सचिव बाबुलाल कुरेशी आणि उर्वरित पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी
बहुजनांच्या भल्यासाठी काम करणारे नेते म्हणून लोकनेते नाईक यांची ओळख आहे. या समाजाच्या उत्थानासाठी त्यांचे आजवरचे योगदान पाहता अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना या संघटनांनी लोकनेते नाईक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अ.भा.मातंग संघाच्या अध्यक्षा कुसुमताई गोपले यांनी या संघटनांच्या सर्व सदस्यांना लोकनेते नाईक यांच्या विजयासाठी परिश्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत.
अखिल आगरी समाज परिषद
मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक भागातील आगरी समाज बांधवांची मातृसंस्था असलेल्या अखिल आगरी समाज परिषदेने देखील लोकनेते नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असून समाजाच्या विविध प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून विधानसभेत ते या प्रश्नांची सोडवणूक करतील, अशी खात्री संघटनेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील आणि कार्यकारिणीने दिली आहे.
नवी मुंबई श्री कुमावत सेवा ट्रस्ट
लोकनेते नाईक यांनी कुमावत समाजाला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्यांनी केलेले सहकार्य समाज कधीच विसरु शकत नाही, अशा भावना व्यक्त करीत नवी मुंबई श्री कुमावत सेवा ट्रस्टचे सचिव मांगेलाल तलेसा आणि कार्यकारिणीने लोकनेते नाईक यांना समर्थनाचे पत्र दिले आहे.
एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकनेते नाईक यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातील काही प्रश्न सुटले असले तरी अन्य काही अद्याप कायम आहेत. हे प्रश्न लोकनेते नाईक निश्चितपणे सोडवतील, असा विश्वास व्यक्त करीत एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष वसंत म्हात्रे, सरचिटणीस ऍड.जयराम म्हात्रे, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी लोकनेते नाईक यांना समर्थन दिले असून त्यांच्या विजयासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
मुस्लीम समाज विजयासाठी एकवटला
नवी मुंबईतील सामाजिक एकोपा कायम राहील, याची लोकनेते नाईक यांनी नेहमीच काळजी वाहिलेली आहे. त्यांच्यासारख्या सर्वधर्मसमभाव जपणार्या नेतृत्वाला जिंकून आणण्यासाठी नवी मुंबईतील मुस्लीम समाज एकवटला असून सर्व मस्जिद ट्रस्ट, कब्रस्तान ट्रस्टसह सर्वांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक मुनावर पटेल, परिवहन समितीचे सदस्य ऍड.जब्बार खान आणि अन्वर शेख यांच्या माध्यमातून हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.