पनवेल :navimubailive.com@gmail.com
ईव्हीएम मशीनच्या नावाने विजयाचा गुलाल अंगावर फासून घेणारे आ. प्रशांत ठाकूर यांच्या काही गुंड कार्यकर्त्यांनी कांतीलाल कडू यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त असताना सुद्धा धारदार शस्त्रे नाचवत नंगानाच केला. फटाक्याची माळ लावून पळून गेलेले कार्यकर्ते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या आदेशावरून कांतीलाल कडू यांच्या घरासमोर दंगल घडविण्यासाठी पुन्हा चालून आले होते. मात्र, पोलिसांनी पिटाळून लावल्याने कुत्र्यासारखे पळून गेले.
कांतीलाल कडू यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ठाकूर यांच्या मनात खदखद होती. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी चिथावणी देवून कडू यांच्यावर हल्ला करण्यास प्रोत्साहित केले होते. निवडणूक काळात फेसबुकवरही काही जण अंगावर सोडले होते.
आज दुपारी पोलिस हिस्ट्रीशिटरवरील गुड्डू उर्फ मयूर कृष्णा ठाकूर, गौरव अजय कांडपिळे, वैभव यशवंत देशमुख, त्यांच्या ताब्यातील कांडपिळे यांची गाडी आणि अन्य एका वाहनासह सात आठ अनोळखी गुंड चालून आले होते.
कडू यांच्या घराजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कांतीलाल कडू रस्त्यावर उतरताच त्यांची पळताभुई थोडी झाली. तरीही काही जण मुद्दामहून पोलिसांसमोर झेंडे मिरवत तिथून जाण्याचा प्रयत्न करीत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वाहने अन्य मार्गाने वळविली. विजयाचा उन्मत्तपणा दाखविणारे प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या चिथावणीवरून अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांच्या घरावर चाल करून आलेले मयूर ठाकूर, गौरव कांडपिळे, वैभव देशमुख आणि इतर सात ते आठ जणांवर दंगल घडविण्याचा कट असल्याचा आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणल्याबद्दल कार्यकर्त्यांसह तिन्ही ठाकूरांवर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी कांतीलाल कडू यांनी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्याकडे केली आहे.