योगेश शेटेच्या आयोजनाखाली सानपाडा वात्सल्य ट्रस्ट येथील मुली तसेच वयोवृद्धांसोबत मनसे करणार ‘दिवाळी’ साजरी
अॅड . महेश जाधव / Navimumbailive.com@gmil.com
प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा मनसेचा अभिनव संकल्प
नवी मुंबई : सद्य:स्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी दिवाळीत फटाके न वाजविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घेण्यात आला आहे. फटाके तसेच बाहेरील खाद्यपदार्थांवरचा खर्च टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा अभिनव संकल्प मनसेने केला असल्याची माहिती सानपाडा-पामबीच विभागातील मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सानपाडा – पामबीच विभागाकडून अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. सानपाडा सेक्टर २, वात्सल्य ट्रस्ट येथे रविवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता मनसेकडून अनाथ मुली तसेच वयोवृद्धांना मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून ही दिवाळी साजरी केली जाणार आहे. सानपाडा – पामबीच विभागातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सानपाडा-पामबीच विभागातील मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी दिली.