अॅड. महेश जाधव : navimumbailive.com@gmail.com
प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा मनसेचा अभिनव संकल्प
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सानपाडा – पामबीच विभागाकडून रविवारी अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. सानपाडा सेक्टर २, वात्सल्य ट्रस्ट येथे रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी मनसेकडून अनाथ मुली तसेच वयोवृद्धांना मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून ही दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, नवी मुंबई शहर सचिव विलास घोणे, नवी मुंबई शहर सहसचिव दिनेश पाटील, वात्सल्य ट्रस्टचे प्रमुख लक्ष्मण नलावडे, समाजसेवक सुरेश मढवी, समाजसेविका सुनंदा दळवी, समाजसेवक शशिकांत गायकवाड,शिवसेना महिला आघाडी सानपाडा विभाग संघटक नलिनी डवले, ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर दौंड, युवासेना बेलापूर विधानसभा समन्वयक सचिन कवडे, समाजसेवक भिवसेन पिंगळे, संतोष खांडगेपाटील आदी उपस्थित होते. सद्य:स्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी दिवाळीत फटाके न वाजविण्याचा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला. फटाके तसेच बाहेरील खाद्यपदार्थांवरचा खर्च टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा अभिनव संकल्प मनसेने केला. मनसेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सानपाडा – पामबीच विभागातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी राजकारण व पक्ष बाजूला ठेवून या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अध्यक्ष योगेश शेटे, उपविभाग अध्यक्ष संजय पाटील, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, उपविभाग अध्यक्ष अजय देशमुख, शाखा अध्यक्ष अमन गोळे, नितीन पाटील, गौरव मातोंडकर तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.