श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आले आहेत. विधानसभा निवडणूकीत त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्यावर मी अन्याय होवू देणार नसल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केले.
भाजपाच्या प्रभाग ९६ मधील नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या वाढदिबसानिमित्त नवी मुंबईतील गणेश नाईक, सौ. मंदाताई म्हात्रे या भाजपा आमदारांचा सत्कार, महिलांसाठी हळदीकुंकु, गुणवंतांचा सत्कार व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्काराला उत्तर देताना सर्वप्रथम आमदार गणेश नाईक यांनी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या कार्याची प्रशंसा केली. सुरूवातीला रूपाली भगत या सभागृहात आल्यावर या काय काम करणार म्हणून काहींनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले. परंतु पावणे चार वर्षात सभागृहात पाठपुरावा करून प्रभागातील समस्या निवारणासाठी संघर्ष करणाऱ्या व सुविधांसाठी पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका रूपाली भगत यांनी आपल्या कामातून प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या चोख उत्तर दिले आहे. गणेश भगत, किसमत भगत, रवी भगत हेदेखील नगरसेविकेच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य करत असल्याने सामाजिक कामांना गती आली असल्याचे सांगत भगत परिवाराच्या सामाजिक कार्यातील योगदानाची आमदार गणेश नाईक यांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमात प्रभागातील स्वच्छतेचा महत्व घराघरात समजावे यासाठी सुमारे १२००हून अधिक महिलांना हळदी कुंकूचे वान(डब्बे)भेट देण्यात आले. त्याचबरोबर नेरूळ सेक्टर १६,१६ए,१८,१८ए,२४ मधील उपस्थित महिलांमधून ५ भाग्यवान महिलाना लकी कूपन ड्रॉ द्वारे सोन्याचे नाने आणि साड़ी देण्यात आली.
ऐरोली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार गणेश नाईक यांचा सन्माचिन्ह शाल पुष्पगुच्छ देवून जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर प्रभागतील सौ. मंगल गोरड, बि. जी. कुंभार, शशिकांत गोरड, सौ. शुभांगी कलट्टी, कु. शुभम वनमाली, अश्विनी नामदेव गर्जे यांचा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार गणेश नाईक यांच्यासमवेत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुजाता पाटील, नगरसेवक सूरज पाटील, गिरीश म्हात्रे, नगरसेविका जयश्री ठाकूर, भाजपा तालुकध्यक्ष राजु तिकोने, युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू, वार्ड अध्यक्ष रमेश नरवडे, समाजसेवक मनोज मेहेर, सुजित शिंदे, संजय सकपाळ,आनंदराव पवार, निवृत्तीदादा गर्जे, भगवान बटुले, बाबा गुजर, बाळासाहेब गर्जे, अजिनाथ गर्जे, रवींद्र गावंड, नामदेव गर्जे, सुरेश लावडे, सुधाकर गर्जे, धनंजय वनमाळी, रूपेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन राकेश तांडेल यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सागर मोहिते, सुर्या पात्रा, रविंद्र भगत व त्यांच्या सहकारी वर्गाने केले होते.