नवी मुंबई : पदपथालगत रस्त्यावर असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यामुळे रस्त्यावर व पदपथावर पथदिव्यांचा उजेड कमी येत होता. भाजपच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेला अखेर वृक्षछाटणी करावी लागली. गुरूवारी सांयकाळी नेरूळ सेक्टर १६, १६ व १८ परिसरात पदपथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पथदिव्यांचा पडलेला उजेड स्थानिक रहीवाशांना पहावयास मिळाला.
प्रभाग क्रमांक-९६ मध्ये झाडांच्या वाढलेल्या फांदयामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर अपुरा पड़त होता. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार भाजपच्या नगरसेविका सौ.रूपाली किस्मत भगत यांनी उद्यान विभागास याबाबत सूचना केल्या. त्या नुसार गुरूवारी स्ट्रीट लाईट सभोवतालील वाढलेल्या झाडांच्या फांदया छाटनी करायला सुरूवात झाली.
यावेळी समाजसेवक शिवाजी पिंगळे, गोरक्षणाथ गांडाल, रमेश नार्वेकर, चंद्रकांत महाजन,अशोक हाडवळे, सुवर्णा हाडवळे, नंदु हाडवळे, भरत शिंदे, राहुल गायकवाड़, सुभाष यादव, रविंद्र भगत उपस्थित होते.