श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग क्रंमाक ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पुढाकारातून नेरूळ सेक्टर ८ परिसरात २१ डिसेंबर रोजी वीज ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वीज ग्राहकांचा मेळावा होणार असून वीज ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारीही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. वीज ग्राहकांच्या समस्यांचे, तक्रारींबाबत या मेळाव्यात निवारण केले जाणार आहे.
लाईट बील जास्त येणे, मीटर जास्त पळणे, वीज बिल वेळेवर न मिळणे यासह वीज ग्राहकांना अन्य समस्या भेडसावत असतात. अनेकदा गैरसमजही असतात. या हेतूने वीज ग्राहक आणि वीज कंपनीचे अधिकारी यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजन सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिली.
या मेळाव्यात येताना वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात आणाव्यात, वीज बिलाची सध्याची प्रतही सोबत आणावी आणि वीज ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी हा मेळावा उपयुक्त असल्याने नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केले आहे.