मोहित भारतीय यांची राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मागणी
मुंबई – गेट वे ऑफ इंडिया येथे जेएनयू हल्ल्याविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यात “फ्री काश्मीर” चाही नारा देण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तसेच अनेक आमदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोहित भारतीय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. .
राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, 6 जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या जेएनयू हल्ल्याविरोधात जी निदर्शने करण्यात आली होती. त्यात निदर्शकांनी “फ्री काश्मीर” चे बॅनर आणले होते. दुर्दैवाने राज्य सरकारमधील मंत्री आणि अनेक आमदारही सहभागी झाले होते.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी घटनेचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे. देशविरोधी निषेधात त्यांचा सहभाग घेणे हे घटनेचे उल्लंघन आहे. त्यामुळे राज्यपालांनी संबंधित मंत्री आणि आमदारांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहित भारतीय यांनी केली आहे.