नवी मुंबई : उंदराच्या वाढत्या उपद्रवाने प्रभाग 84 मधील नेरूळ सेक्टर 2,4 व जुईनगरमधील जनता त्रस्त झाली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या मूषक नियत्रंण कामगारांच्या माध्यमातून स्वत: हजर राहून अखेरीला मूषक नियत्रंण मोहीम प्रभागात राबविण्यास सुरूवात केली आहे.
प्रभाग 84 मध्ये उंदरांच्या वाढत्या त्रासाच्या तक्रारी स्थानिक रहीवाशी भाजप कार्यालयात येवून भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई अध्यक्षा सुहासिनी नायडू यांच्याकडे करत होते. यामुळे समस्येचे गांभीर्य सुहासिनी नायडू यांनी लेखी निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. अखेरिला पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मूषक नियत्रंणचे कर्मचारी घेवून स्वत: उभे राहून सुहासिनी नायडू यांनी मूषक नियत्रंण मोहीम प्रभागात राबविली.
नेरूळ सेक्टर 2 जय हिंद अपार्टमेंट, श्रद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स, आम्रपाली अपार्टमेंट, सविनय अपार्टमेंट, घरकुल अपार्टमेंट, वारणा अपार्टमेंट, आदर्श अपार्टमेंट, इंद्रधनुष्य अपार्टमेंट, अमरदीप अपार्टमेंट, ब्रिज व्हिव अपार्टमेंट, सेक्टर 4 येथे न्यू हेवन सोसायटी, सागर संगम सोसायटी , शिव पाल्म बीच सोसायटी , पाल्म बीच सोसायटी ,आनंदवन सोसायटी, न्यू पामबीच सोसायटी, शांती निकेतन सोसायटी, सप्तर्षी सोसायटी व स्मशान भूमी परिसर व महानगरपालिका वॉर्ड ऑफिस समोरील सर्व ठिकाणी मूषक नियत्रंण मोहीम राबविताना सुहासिनी नायडू यांनी ठिकठिकाणी मूषक नियत्रंण प्रतिबंधात्मक गोळ्या टाकून घेतल्या व दुुसर्या दिवशी जावून किती उंदिर मृत झाले याचाही त्यांनी आढावा घेतला. स्थानिक जनतेने स्वत: उभे राहून दोन दिवस प्रभागात मूषक नियत्रंण मोहीम राबविणार्या सुहासिनी नायडू यांची प्रशंसा केली आहे. या प्रभागात शिवसेनेचा नगरसेवक असताना स्थानिक रहीवाशी आपल्या तक्रारी घेवून भाजप कार्यालयात येतात व तात्काळ त्या समस्यांचे निवारणही होते याचे पडसाद 3 महिन्यांनी होत असलेल्या होत असलेल्या पालिकेच्या निवडणूकीत नक्कीच पहावयास मिळतील, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.