ओव्हरलोडिंग विरोधात मनसे वाहतूक सेनेचा चाबूक मोर्चा
नवी मुंबई : अनंतकुमार गवई
नवी मुंबईत ट्रक, डंपर, कंटेनर, बसेस मधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग तात्काळ कारवाई करून थांबवण्यात यावी यासाठी नवी मुंबई मनसे वाहतूक सेने तर्फे गुरूवारी वाशी येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयवर (RTO) ‘चाबूक-मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्यात मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ शेख, नवी शहर अध्यक्ष गजानन काळे व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. एपीएमसी फळ बाजार ते वाशी RTO कार्यालयापर्यंत या चाबूक मोरच्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी ‘प्रवाश्यांचे होतायेत वांदे, बंद करा काळे धंदे’, ‘अशा अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’, ‘लोकांच्या जीवाशी खेळतंय कोण, RTO अधिकारी आणखीन कोण’, ‘ओव्हरलोडिंग बंद करा, बंद करा’ या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
सन २०१८ ते २०१९ या संपूर्ण कालावधीत ओव्हरलोड चालणारी वाहने व प्रवासी बसेस मधून बेकायदा व्यावसायिक माल वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस बाबत नवी मुंबई मनसे वाहतूक सेनेने अनेकवेळा RTO ला पत्रव्यवहार करून देखील या विषयाकडे RTO अधिकाऱ्यांकडून सुनियोजितपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर यांनी केला आहे. इतकेच नाहीतर यामध्ये RTO अधिकाऱ्यांचा वाहतुकदारांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप देखील मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
गुरूवारी मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक उप-प्रादेशिक अधिकारी सावंत, कटके, शितोळे देशमुख यांना निवेदन देऊन तात्काळ नवी मुंबईतील रस्त्यांवर सुरू असणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच प्रवासी बसेसमधून अनधिकृतपणे होणारी व्यावसायिक मालाची वाहतूक कारवाई करून बंद करावी, तसेच नवी मुंबईतील मुदत संपलेल्या परमिट रिक्षा जप्त करून कारवाई करण्याची मागणी केली. मनसेची आक्रमकता पाहून RTO अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करत दि.२० जानेवारी २०२० पासून मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित वाहतुकदारांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले.
मनसेच्या शिष्टमंडळात मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ भाई शेख, शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, चिटणीस शाम भाई, जमीर पटेल, सचिन जाधव, वाहतूक संघटक अभिलेश दंडवते, महेश कदम, नितीन लष्कर, लक्ष्मण लेकवळे, विजय गायकवाड मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, निलेश बाणखेले, विनोद पार्टे, प्रसाद घोरपडे, सचिव विलास घोणे, सहसचिव शशिकांत कळसकर, अमोल इंगोले, दिनेश पाटील महिला सेनेच्या उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, लीना पाखरे, विद्या इनामदार, शीतल मोरे, पापिया दंडपत, अरुणा राठोड, महापालिका कामगार सेनेचे सरचिटणीस अभिजित देसाई, कार्याध्यक्ष अमोल अहिवळे, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुरमेकर, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, योगेश शेटे, श्याम ढमाले, उमेश गायकवाड, आनंद चौगुले, अरुण पवार, निलेश सैनदाने, दत्ता वऱ्हाडी, चंद्रकांत डांगे, प्रशांत पाटेकर, सतीश पडघन व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.