मुंबई : राज्यात आमचे सरकार स्थापन झाल्यावर बरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जस्टिस लोया प्रकरणात जर काही तक्रार आली तर त्या विषयाची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले होते आता एखाद्या तक्रार दाराकडून सबळ पुरावे आणि तशी तक्रार आली तर सरकार त्यासाठीची चौकशी करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज मुंबईत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज एक महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत तीन तास झालेल्या बैठकीमध्ये मंत्रालायातील करण्यात येणारे शासकीय कामकाज, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिशा आणि पक्ष संघटना मजबूत करण्यास संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
जस्टिस लोया प्रकरणात नुकतेच ग्रह मंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी तक्रार आल्यास चौकशी केली जाईल असे विधान केले होते त्यावर मलिक यांना सवाल विचारला असता ते म्हणाले की,जस्टिस लोया प्रकरणात तक्रारदारकडे जर सबळ पुरावे असतील आणि तशा प्रकारची तक्रार त्यांनी केली तरी या प्रकरणाची पुन्हा चौकशी सरकार करेल यासाठीची भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन झाल्यावरच स्पष्ट केले होते याची माहिती दिली. त्यासोबत राज्यातील पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. रात्री उशिरापर्यंत सर्व पालक मंत्र्यांची नावे आणि यादी जाहीर केली जाईल, यासाठीचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले असून तेही यादी जाहीर करतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.