अनंतकुमार गवई
नवी मुंबई :- समाजकारण असो वा अथवा राजकारण ,सुख असो वा दुःख प्रत्येक वेळी वेळ काळ न बघता अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबई पोलिसांचा शनिवारी राजे प्रतिष्ठान नवी मुंबईच्या वतीने सन्मान करण्यात आला.या वेळी त्यांना नवी मुंबई शहरात राजे प्रतिष्ठानच्या वतीने चालणारे कार्य,भविष्यात होणारे कार्य याची माहिती देण्यात आली.त्याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप आणि वेळीवेळी लागणाऱ्या सहकार्याची ग्वाही दिली.तर काहींनी समाजकार्यात आणी उदयनराजे महाराजांचे कार्य कसे पुढे नेता येईल यांच्यावर मार्गदर्शन केले.
छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या नेतृत्वाखाली राजे प्रतिष्ठान संस्थेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरु असून मुंबईत मुंबई संघटक चंद्रकांत धडके (मामा) मुंबई अध्यक्ष प्रकाश कोळी तर नवी मुंबईत नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम जोमाने सुरु आहे.नवी मुंबई काम करत असतांना पोलिसांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळावे त्याचबरोबर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची ओळख व्हावी याकरिता शनिवारी नवी मुंबईत नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्यात आली.यावेळी नवी मुंबई महिला अध्यक्ष उर्मिला रोकडे,उपाध्यक्ष विमल हांडे,कार्याध्यक्ष अर्चना पार्टे,कोपरखैरणे उपाध्यक्ष सविता बिडवाई, सदस्य राजू राज पुरोहित,डॅनी डिसोझा,कोपरखैरणे विभाग अध्यक्ष मंगल शिरगावकर,स्नेहा चांदोरकर,मालती सोनी,सुनीता शेट्टी,तायरा खान,मालती आव्हाड यांची उपस्थिती होती.