नवी मुंबई : नेरूळ पूर्वेला वर्दळीच्या ठिकाणी अनेक भागात चालक वाहने वेगाने हाकत असल्याने सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नेरूळ पूर्वेला अनेक ठिकाणी गतीरोधक बसविण्याची मागणी नेरूळ पूर्वचे विभागप्रमुख संजय भोसले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. मागणी करताना गतीरोधक कोठे कोठे बसवावेत याची यादीही शिवसेना विभागप्रमुख संजय भोसले यांनी महापालिका प्रशासनाला सादर केली आहे.
नेरूळ पूर्वेला बसडेपो ते रेल्वे स्टेशन या दरम्यान ये-जा करण्याच्या मार्गावर महापालिका प्रशासनाने कोठेही गतीरोधक बसविलेले नाहीत. या परिसरात सकाळ-दुपार व संध्याकाळी उशिरापर्यत मोठ्या प्रमाणावर महिला, पुरूष, शालेय विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ असते. याच मार्गावर भाजी मार्केट व अन्य मार्केट असल्याने वर्दळ वाढीस लागते. परिसरात दोन शाळा असल्याने शालेय विद्यार्थी व पालक यांचीही सकाळ-दुपार- संध्याकाळ ये-जा असते. वर्दळीचा भाग असतानाही दुचाकी व चार चाकी वाहन चालक वेगाने वाहने हाकत असल्याने अपघाताच्या वाढत्या घटना पाहता व समस्येचे गांभीर्य पाहता या परिसरात तात्काळ गतीरोधक बसविण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख संजय भोसले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. परिसरात गतीरोधक बसविण्यासाठी पोलिसांच्या वाहतुक विभागाकडे व महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही संबंधितांनी समस्येचे गांभीर्य जाणून घेतले नसल्याचा संताप शिवसेना विभागप्रमुख संजय भोसले यांनी व्यक्त केला आहे.
१) गुडलक स्टोअर (रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता), २) शिवसेना शाखा (रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता), ३) जैन मंदिर रोड (रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता), ४) मस्जिद रोड (नेरूळ बसडेपोकडे जाणारा रस्ता), ५) जैन मंदिर (नेरूळ बसडेपोकडे जाणारा रस्ता), ६) नेरूळ सेक्टर १५, एन.एल. ६, १ ते १२ (नेरूळ बसडेपोकडे जाणारा रस्ता), ७) सेंट ऑगस्टिन रोड, संगम अपार्टमेंटजवळ या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे.