स्थायी समिती सभापतीनी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन
अनंतकुमार गवई
नवीमुबई : नवी मुंबई महानगरपालिकामध्ये विविध विभागात कंञाटी पध्दतीवर सुमारे ७५०० हजार कंञाटी कामगार काम करत असुन मागिल अनेक दिवसापासून कंञाटी कामगार त्याना मिळणाऱ्या १४ महीन्याच्या थक्कबाकीतील फरकाची रक्कम मिळेल म्हणून आस लावून बसले होते. शुक्रवारी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने स्थायी समिती सभापती नवीन गवते यांची भेट घेऊन कंञाटी कामगारांना त्याच्या हक्काची रक्कम मिळावी याबाबतचा ठराव त्वरीत स्थायी समिती मध्ये मंजूर करावा असे निवेदन दिले. त्यावेळी स्थायी समिती सभापती गवते यांनी सांगितले की आजच कंञाटी कामगारांचा थक्कबाकीचा विषय सभागृहात मंजूर करून आठ दिवसात सर्व विभागांतील कंञाटी कामगारांच्या बॅंक खात्यावर ठेकेदारा मार्फत थक्क बाकी मिळेल असे आश्वासन नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अॅड. सुरेश ठाकुर याच्या मार्गदशनाखाली सहचिटणीस नरेंद्र वैराळ याच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी नवी मुबई जिल्हा संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, युनियनचे पदाधिकारी यंशवत काळे, नवनाथ जगदाने, शंकर पडूळकर यांचा समावेश शिष्टमंडळात होता. यामुळे नवी मुंबई शहरातील कंत्राटी कामगार आनंदी झाले असुन त्यानी स्थायी समिती सभापती नविन गवते यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व स्थायी समिती सदस्य व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.