नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथे साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवार, दि. २० फेब्रुवारी रोजी साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी साईंच्या पादुका पुजन व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरदीप अपार्टंमेट, आदर्श अपार्टमेंट व एलआयजीमधील रस्ता या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई भंडारा आयोजित करण्यात आला असून १९ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७ वाजता साईंच्या पादुका पुजनानंतर साईंबाबांचा पालखी सोहळा नेरूळमध्ये काढण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता साईंचा अभिषेक, ७ वाजता महाआरती, ८ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसाद, तसेच याचवेळी सुस्वर भजनाही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे हे साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक असून शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे या जनसेवा प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. या भंडाऱ्यात व पालखी सोहळ्यात साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साई भंडाऱ्याचे आयोजक मनोज चव्हाण यांनी केले आहे.