स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com/ ९८२००९६५७३
नवी मुंबई : सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात महाशिवरात्रीनिमित्त सारसोळेच्या ग्रामस्थांनी गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेला बामणदेवाचा भंडारा उत्साहात पार पडला. सुमारे १५ हजाराहून अधिक भाविक या भंडाऱ्यात सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यत बामनदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक, बेलापुरातील भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्यासह सर्वच क्षेत्रातील रथी-महारथी सहभागी झाले होते.
कॉंग्रेस पक्षाच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस संतोष शेट्टी, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कॉंग्रेसच्या नगरसेविका मीरा पाटील, कॉंग्रेसचे दिनेश गवळी, गणेश पालवे, गुरू म्हात्रे, शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख व माजी सिडको संचालक नगरसेवक नामदेव भगत, उपशहरप्रमुख गणेश घाग, गणपत शेलार, शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे, शिवाजी महाडीक, उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, दिपक शिंदे, शाखाप्रमुख लक्ष्मण पोपळघट, दिलीप आमले, इमरान नाईक, विशाल विचारे, नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, माजी नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत, मनोज चव्हाण, युवा सेनेचे निखिल मांडवे, भाजपचे नगरसेवक संपत शेवाळे, सुरज पाटील, गिरीश म्हात्रे, नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, सौ, जयश्री एकनाथ ठाकूर, भाजपचे नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी विजय घाटे, नवी मुंबई भाजप युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू, दशरथ भगत, गणेश भगत, पांडूरंग आमले, रवी भगत, हरेश भोईर, एकनाथ ठाकूर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महादेव पवार, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, मनकासेचे नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठूळे, विलास घोणे, दिनेश पाटील, योगेश शेटे, सुरेश मढवी, संदीप गलुगडे, वंचित बहूजन आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष विरेंद्र लगाडे, पर्यावरणप्रेमी सुकुमार किल्लेदार, दिनेश जोशीसर, उद्योजक बाळासाहेब सरफरे, संकेत सरफरे, संजय बोरकर, मिलिंद सपकाळ, पत्रकार निलेश पाटील, महादेव देशमुख, स्वप्निल घाग, शिवम सोसायटीचे अरूण निकम, सोपान सावंत, यांच्यासह सर्वच क्षेत्रातील रथी-महारथी मोठ्या संख्येने या भंडाऱ्यात सहभागी झाले होते. दिवसभर भजनांनी बामणदेव परिसर भक्तीमय झाला होता. नवी मुंबई, पनवेल, ठाणे, उरण व मुंबईतून मोठ्या संख्येने या भंडाऱ्यात सहभागी होण्याकरिता भाविक आले होते. हा भंडारा यशस्वी करण्यासाठी सारसोळे गावच्या ग्रामस्थांनी व कोलवाणी माता मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.