नवी मुंबई : महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर देवीदेवतांची मंदिरे आहेत. आई एकविरा माता आगरी-कोळी समाजाची कुलदैवत आहे. आगरी-कोळी समाजाबरोबरच महाराष्ट्रातील असंख्य भाविक आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी कार्ला गडावर येत असतात. त्यातील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी पायर्या चढून मंदिराकडे जातात, तर काही ज्येष्ठ भाविकांना वयोमानानुसार पायर्या चढून जाणे जमत नसल्याने ते पायथ्याजवळ असलेल्या मंदिरातील आई एकविरा मातेचे दर्शन घेऊन माघारी फिरतात.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे सहकुटुंब आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी गेले होते. आई एकविरा माता ठाकरे कुटुंबाचे देखील कुलदैवत असल्याचे प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आई एकविरा मंदिर सुशोभिकरण, सोयी- सुविधांसाठी ना. आदित्य ठाकरेंचा ग्रीन सिग्नल एकविरा माता मंदिर सुशोभिकरणाचा आणि तेथील सोयी-सुविधांचा विषय नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 19 डिसेंबर 2019 रोजी पुरवणी मागणीद्वारे मांडला होता. एकविरा देवीच्या मंदिरात जाण्याकरिता रोप-वे बरोबरच जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आग्रही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी देखील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पुरवणी मागणीतून केली होती. सदरहू व्यवस्था केल्यानंतर आई एकविरा माता आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई एकविरा माता मंदिराचे सुशोभिकरण आणि इतर महत्वाच्या पायाभूत सोयी-सुविधा करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे आपण केलेल्या प्रयत्नांना ना. आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आ. सौ.मंदाताई म्हात्रे यांनी आनंद व्यक्त केला आहे.