नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील प्रभाग ८७च्या शिवसेना शाखेत विभागप्रमुख रतन मांडवे आणि शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या माध्यमातून शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी व युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपअधिकारी निखिल मांडवे यांनी २४ फेब्रुवारी रोजी विभागातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या स्मार्ट कॉर्डचे सवलतीच्या दरात वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
६५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळत आहे. पूर्वी आधार कॉर्ड दाखवून सवलतीच्या दरात प्रवास करता येत होता. तथापि आता एसटी महामंडळाने स्मार्ट कॉर्ड लागू केले आहे. ज्येष्ठांना या वयात एसटी डेपोमध्ये स्मार्ट कॉर्डकरीता हेलपाटे मारावे लागू नये म्हणून शिवसेना शाखेमध्ये २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत एसटी महामंडळाच्या स्मार्ट कॉर्डचे सवलतीच्या दरात वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होवून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी केले आहे.