नवी मुंबई : प्रभाग क्रं ८५/८६ भाजपच्या वतीने मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी नेरूळ सेक्टर सहा परिसरात फ्री हेल्थ इन्श्युरन्स कार्ड, ज्येष्ठ नागरिक दाखला, महिलांसाठी मोफत कर्करोग (कॅन्सर) शिबिर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ५ लाख रूपयांपर्यतचे फ्री हेल्थ इन्श्यूरन्स कॉर्ड तसेच ज्येष्ठ नागरिक दाखला यासाठी नेरूळ सेक्टर ६ येथील नगरसेविका जनसंपर्क कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शन दरबारमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महिलांसाठी मोफत कर्करोग (कॅन्सर) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात स्थानिक भागातील रहीवाशांनी व कर्करोग शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्थानिक नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.