नवी मुंबई : सानपाड्यातील शिवसेना नगरसेविका कोमल सोमनाथ वास्कर ह्यांच्या सातत्यपूर्वक पाठपुराव्याने सानपाड़ा से. ५ भुखंड क्र.५१५ अ/ ब येथे सिनीयर सिटीझन सेंटर ( ४०+) भवन तसेच वुमन वेल्फेअर सेंटर च्या पायाभरणी ( भूमिपुजन ) सोहळा शिवसेना उपनेते विजय नाहटा , नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी सरपंच रामा मढवी , ४०+ चे अध्यक्ष प्रदीप पाटिल, नरेश गौरी, दिलीप मढवी ह्यांच्या हस्ते संपन्न झाला.
सानपाड़ा विभागासाठी समाजपयोगी देखण्या वास्तु स्थानिक नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांच्या माध्यमातून उभ्या राहत असल्यामुळे अभिमान वाटत असल्याचे नमुद करुन नगरसेविकांचे स्थानिक ग्रामस्थांनी कौतुक केले. नवी मुंबई ४०+ सदस्यांना दिलेला शब्द पूर्ण करुन वचन पूर्ति केल्याबद्दल नवी मुंबई ४०+ संघटनेच्या वतीने स्थानिक नगरसेवकांना धन्यवाद देवुन आभार प्रकट करण्यात आले. तर सदर भूखंड विकसित करताना अनेक अड़चणी पार करुन एकत्रिकरणाचा प्रयोग अमलात आणल्याचे नगरसेविकांनी नमुद केले. यावेळी शिवसेना उपज़िल्हाप्रमुख प्रकाश पाटिल, मिलिंद सूर्यराव, सहायक पोलिस आयुक्त चव्हाण, माजी नगरसेवक दिलीप बोऱ्हाडे, सानपाड़ा गावातील ज्येष्ठ रहिवाशी शांताराम अनंत ठाकुर, दगडु वास्कर, बळीराम वास्कर, गणेश बुवा ठाकुर, नंदकुमार पाटिल, कमळाकर दळवी, हरिराम पाटिल, भास्कर पाटिल, दत्ता वास्कर, रोहिदास वास्कर, काशीनाथ वास्कर, प्रभाकर वास्कर, शांताराम दत्तु ठाकुर, केशव वास्कर, सातारा कराड बॅकेचे संचालक श्यामराव मोरे, विभागप्रमुख आशिष वास्कर, उपविभागप्रमुख विनोद माने, शाखाप्रमुख अनंता ठाकुर, सुरेश क़दम, ट्राई आर्चचे व्यवस्थापक विनय वाडेकर ( अर्किटेक) ग्रामस्थ राजराम पाटिल, भालचंद्र म्हात्रे, श्रीनिवास पाटिल, रूपेश ठाकुर, शंकर पाटिल, नवनाथ पाटिल, नरेश नाईक, रविंद्र पाटिल , रत्नाकर दळवी, मनोज भोईर, सुनील पाटिल, विश्वनाथ मढवी , अविनाश मढवी, विनोद मढवी, सुभाष ठाकुर, मंगेश ठाकुर, धनंजय पाटिल, जयराम पाटिल, प्रकाश ठाकुर, मनोहर भोईर, महेश वास्कर, जनार्दन वास्कर, संजय वास्कर, अशोक वास्कर, अवधूत वास्कर, राजेश पाटिल, सत्यवान पाटिल , संजय ठाकुर, शिवसेना महिला पदाधिकारी सावित्री चौगुले, कविता ठाकुर, सुलभा केसरकर, सिंथिया घोड्के, दर्शना चव्हाण, मुकेकर, कुरलेकर तसेच नवी मुंबई ४०+ , ॐ कार कला सर्कल , सानपाड़ा व गावदेवी सानपाड़ा ४०+ चे सदस्य ग्रामस्त व रहिवाशी उपस्थित होते.