स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com :- ९८२००९६५७३
नवी मुंबई : एका भरधाव वेगातील वाहनाने सारसोळे स्मशानभूमी मार्गाने येत वाधवा टॉवरसमोरील पदपथानजिक रस्त्यावर वाहनांना धडका देत पलायन केले. या अपघातात दोन वाहनांचे खूप नुकसान झाले असून एका वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. रविवारी रात्री ११ वाजून १० मिनिटाच्या सुमारास शिव पामबीच सोसायटीच्या प्रवेशद्वारानजिक घडली.
अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येवून तीन वाहनांना धडका दिल्या. एका वाहनाला घासून जात दुसऱ्या वाहनाच्या मागील बाजूचे व तिसऱ्या वाहनांच्या मागील बाजूस एका साईडचे या धडकेत नुकसान केले. अज्ञात वाहनाची धडकच इतकी जोरात होती की, शिवा पामबीच सोसायटीतील रहीवाशी शर्मा यांची रस्त्यावर उभी असलेली गाडी थेट पदपथावर चढली. अज्ञात वाहनाचेही पुढील बाजूचे नुकसान झाले असून पेट्रोल गळतीही त्या वाहनातून होत होती. नेरूळ तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत याचवेळी बाजूच्या सोसायटीतील रहीवाशांशी निवडणूक तयारीबाबत चर्चा करत होते. धडकेमुळे आवाजच इतका जोरात झाला की सभोवतालचे लोक लगेचच रस्त्यावर जमा झाले. शर्मा यांचे वाहन धडकेत पदपथावर तर चढलेच, पण धडकेमुळे वाहनाचा टायरही फुटला.
रवींद्र सावंत घटनास्थळी धाव घेत संबंधितांना दिलासा देत नेरूळ पोलिसांशी तसेच पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांशी घटनास्थळी बोलावून घेतले. अपघाताची कल्पना दिली. याचवेळी ठोकर देणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने ते धडक देणारे वाहन जुईनगर रेल्वे वसाहतीमध्ये गेले असल्याची माहिती दिली. पोलिस तात्काळ त्या वाहनाचा शोध घेण्यासाठी जुईनगर रेल्वे वसाहतीच्या दिशेने निघून गेले. रवींद्र सावंत यांनी अपघात झालेल्या तीनही वाहनचालकांना अपघातग्रस्त वाहनांचे फोटो काढावयास सांगून नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी पाठवून दिले.
यावेळी जमलेल्या सिडकोतील रहीवाशांनी आम्हाला येथील नगरसेवक कोण आहे, याचीही माहिती नाही. आमच्या कोणत्याही अडचणीला रवींद्र सावंतच नेहमी धावून येत असल्याचे व आमची सर्व कामे करून देत असल्याचे सांगितले. अपघात झाल्यावरही काही सेंकदातच रवींद्र सावंत आले, पोलिसांना बोलविले, सर्व अन्य प्रकारचे सहकार्य केले, त्यामुळे सेक्टर चारच्या आम्हा रहीवाशांसाठी रवींद्र सावंतच नगरसेवक असल्याची माहिती यावेळी उपस्थित रहीवाशांनी दिली.