अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोनामुळे देशाचे कितपत आर्थिक नुकसान झाले, किती मृत्यू पडले, किती लोकांना लागण झाली याची तपशीलवार आकडेवारी लवकरच समजेल. परंतु कोरोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्थगित झाल्या, यात नवी मुंबईचाही समावेश आहे. निवडणूका स्थगित झाल्याने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली असून इच्छूकांना आपल्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी तयारीसाठी अजून कालावधी मिळाला आहे. नवी मुंबई महापालिकेत तिकिट कापाकापी, क्रिस्टलशी जवळीक असल्याचा गैरफायदा उचलत आपल्या जवळपासच्या विभागात कोणी आपल्यापेक्षा वरचढ ठरू नये म्हणून खेळलेले राजकारण, कार्यकर्त्यापेक्षा सर्व्हेवाल्यांना मिळालेले महत्व, तिकिट मिळविण्यासाठी झिजवाव्या लागणाऱ्या चपला, तिकिटवाटपातील एकाधिकारशाही आणि नेतृत्वाशी जवळीक साधत काही नगरसेवकांनी आपल्या नोडमध्ये सुरू केलेली मनमानी या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्याने प्रस्थापितांचा खरा चेहरा कार्यकर्त्यांच्या व जनतेच्याही नजरेसमोर आला. निवडणूका स्थगित झाल्याने इच्छूक कार्यकर्त्यांना नेतृत्वाकडे आपली पत स्पष्ट झाल्याने व काही नगरसेवकांचे राजकारणही उघड झाल्याने योग्य तो निर्णय विचारपूर्वक घेण्यास कालावधी मिळाला आहे आणि जनतेलाही कारस्थान करणाऱ्यांचा खरा चेहरा दाखवून देण्याची संधी अनायसे उपलब्ध झाली. याहीपेक्षा आपसातील मतभेदामुळे महाराष्ट्र भाजपला नवी मुंबईतील प्रभागाप्रभागातील भाजप कळल्याने बोनकोडे नेतृत्वासमोर जवळीक असणाऱ्या काही नगरसेवकांच्या कारस्थानामुळे अडचणी निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणूका एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट होताच इच्छूक कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा अहवाल व पाठीशी असणाऱ्या जनसंपर्काचा दावा करत नेतृत्वाकडे तिकिटीसाठी हट्ट धरला, त्याचवेळी नेतृत्वाने सर्व्हेला नाव टाकू आणि सर्व्हेचा अहवाल आल्यावर पाहू असे उत्तर दिल्याने कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. झेंडा आम्ही उचलायचा, गळा फुटेपर्यत नेत्यांचा उदोउदो करायचा, घराकडे कानाडोळा करत समाजसेवा करायची, घरची बायका-मुले उपाशी ठेवून लोकांना मदत करायची आणि तिकिट मागायची वेळ आल्यावरच नेतृत्वाने सांगायचे, सर्व्हेवर ठरवू. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या नेतृत्वासाठी काम केले, त्याने तिकिट देण्यासाठी सर्व्हेच्या कुबड्या पुढे करायच्या यामुळे कार्यकर्तेही हतबल झाले आहे. नगरसेवकांना तरी ठेकदारांकडून विकासकामांचे कमिशन मिळते, पण ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक नाही तेथील कार्यकर्ता घरचे पैसे ओतून पक्षसंघटना व नेतेमंडळींचा नावलौकीक वाढवित असतो. असे असताना कार्यकर्ते तलकादू ठरले आणि नेतेमंडळी सर्व्हेवाल्यांना डोक्यावर घेवून नाचू लागली असे चित्र नवी मुंबई शहरातील राजकारणात निर्माण झाले असल्याचा संदेश खाडीपलिकडे मंत्रालयीन पातळीवर तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींपर्यत जावून पोहोचला आहे. तिकिटवाटपात सर्व्हे कोणत्या कार्यकर्त्याला तिकिट द्यायचे हे ठरविणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना समजल्याने त्या त्या पक्षातील बैठकांमध्ये संताप निर्माण होवू लागला आहे.
भाजपमध्ये तिकिट मिळविण्यासाठी सर्वाधिक गर्दी असल्याने क्रिस्टल कार्यालय व गौरव बंगला या दोन ठिकाणी तिकिटीसाठी राबता वाढल्याचे दिसून आले. बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या कार्यकर्त्यांना एकत्र बसू, तुमच्यातीलच एक उमेदवार ठरवू, तोडगा न निघाल्यास सर्वाची नावे व केलेली कामे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवू, तो देतील त्या निर्णयाचा आदर करून आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू अशी समजूत सर्वच इच्छूकांच्या काढत असतानाच दुसरीकडे मात्र सर्व्हेचा बोलबाला इतका झाला की नवी मुंबईतील भाजपच्या तिकिट सर्व्हेवाले देणार असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. त्यातच क्रिस्टलशी असलेल्या जवळीकतेचा गैरफायदा उचलत काही नगरसेवकांनी आपण आपल्या प्रभागातच नाही तर सभोवतालच्या प्रभागातही श्रेष्ठ राहीले पाहिजे यासाठी कुरघोड्यांचे राजकारण खेळले. क्रिस्टलवालेही त्या नगरसेवकांशिवाय अन्य कोणाचे ऐकत नसल्याने तेच नगरसेवक क्रिस्टल चालवत असल्याचे चित्र कार्यकर्त्यांनाही जवळून पहावयास मिळाले. आपले महत्व आपल्या नोडमध्ये कमी होवू नये म्हणून क्रिस्टलच्या खांद्यावर बंदुक ठेवत आपल्याच पक्षातील मातब्बरांचे तिकिट कापण्याचे उद्योग काही नगरसेवकांनी केले असल्याचे उद्योगही यानिमित्ताने उघडकीस आले.
नवी मुंबई महापालिका तिकिट वाटपात आमदार मंदाताई म्हात्रेंना फारसे स्थान नसणार, सर्व तिकिट आम्हीच फायनल करणार असा प्रचारही काही घटकांनी सुरू केल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवरही या प्रचाराही दखल घेण्यात घेण्यात आली आहे. नवी मुंबईतील सर्वच राजकीय घडामोडी भाजप प्रदेश कार्यालयात गेल्याने प्रदेश भाजपला नवी मुंबईची इंत्यभूत माहिती मिळण्यास मदत झाली आहे.
आपली तिकिट कापण्यात कोणी कोणी अडथळे आणले याचेही चित्र दिघा ते बेलापुरदरम्यानच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट झाल्याने उर्वरित तीन महिने त्या उद्योगी व इतरांचे तिकिट कापण्यात आक्रमकता दाखविणाऱ्या नगरसेवकांना डोकेदुखी ठरणार आहे. आमचे तिकीट कापण्यासाठी तुम्ही ताकद वापरली, तुमची प्रतिष्ठा पणाला लावली , आता तुमचे कर्ज फेडायची वेळ आमची अशी उघड भाषा आता कार्यकर्त्यांकडून वापरली जावू लागली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छूकांनाही मतदारसंघ कोणाला मिळणार याचा अंदाज आल्याने त्यांनी वेळ पडल्यास अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना एकीकडे ६५ ते ७० जागा लढण्यावर ठाम असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वाढते इनकमिंग पाहता आता त्यांच्याकडूनही ४० ते ४२ जागांचा आग्रह धरला जात आहे. कॉंग्रेसलाही काही जागा मिळत नसल्याने स्थानिक भागातील कॉंग्रेसींकडूनही महाआघाडी नाही झाली तर बरे होईल, असा सूर आळविला जात आहे. ज्या नेत्यांसाठी आयुष्य घालविले, तोच नेता तिकिट देत नसल्याने इतकी वर्षे झक मारली असा संताप आता भाजप व महाआघाडीतील निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांकडून आळविला जात आहे.