अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कामगारांचे जानेवारी महिन्याचे वेतन मंगळवारी (दि. २४ मार्च) रोजी करण्यात आले असून सारसोळे गावचे भूमीपुत्र व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांचे मूषक नियत्रंण कामगारांनी आभार मानले आहेत.
मार्च महिना अर्धा संपला तरी मूषक नियत्रंण कामगारांचे जानेवारी महिन्याचा पगार झाला नव्हता. याप्रकरणी मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाला लेखी तक्रारपत्र सादर करत लवकरात लवकर मूषक नियत्रंण कामगारांचा पगार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. मूषक नियत्रंण कामगारांच्या थकीत वेतनाबाबत नवी मुंबईचे विकासपर्व असणाऱ्या संदीप नाईकांनाही कल्पना देण्यात आली होती. मंगळवारी दुपारी या कामगारांच्या हातात वेतन मिळताच त्यांनी मनोज मेहेर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.