• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2020

हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

adminbyadmin
in Uncategorized
0
हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे : अजित पवार

मुंबई : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांना फटका बसला आहे. अमेरिकेत साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ४ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील वीज बंद करुन घराच्या दरवाजात, बाल्कनीत दिवे, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसादही मिळाला, पण काही उत्साही मंडळीनी पुन्हा मशाली घेऊन रस्त्यावर आले. त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या लोकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारले आहे.

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचे गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितले असतानाही, मशाली पेटवून लहान मुले, महिलांना सोबत घेऊन झुंडीने रस्त्यावर उतरणे, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणे, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत  यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, असे आवाहनही अजित पवारांनी लोकांना केले आहे.

दरम्यान, राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा कोरोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणे, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचसोबत टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनेच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीने उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

शिवसेनेचे उद्यापासून प्रभाग ९६ व ९७ मध्ये लोकोपयोगी उपक्रम

Next Post

भाजपाने संकटकाळी गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावी!

Next Post
प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत

भाजपाने संकटकाळी गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावी!

ग्रामीण भागातील टाळेबंदी सरकारने उठवावी : माजी खासदार राजू शेट्टी

ग्रामीण भागातील टाळेबंदी सरकारने उठवावी : माजी खासदार राजू शेट्टी

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com