• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 6, 2020

ग्रामीण भागातील टाळेबंदी सरकारने उठवावी : माजी खासदार राजू शेट्टी

adminbyadmin
in Uncategorized
0
ग्रामीण भागातील टाळेबंदी सरकारने उठवावी : माजी खासदार राजू शेट्टी

मुंबई : १४ एप्रिलला देशातली टाळेबंदी (लॉकडाउन) संपल्यानंतर महानगर आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. टाळेबंदीचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्ष, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते म्हणणे आणि वास्तव हे वेगळे आहे असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

ग्रामीण भागात १४ एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी आमची मागणी आहे. कारण खेड्यांमध्ये करोनाचा फार प्रसार झालेला नाही. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे क्वारंटाइन ठेवण्यात आले . सरकार परदेशातून आलेल्यांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवतं आहे. अशात ग्रामीण भागातील लोकांनीही बाहेरुन लोकांनाही ही प्रक्रिया पार पाडायला लावली. आता बाहेरुन माणसं आलीच नाहीत तर रोगाचा फैलाव कसा काय होईल? असाही प्रश्न शेट्टी यांनी विचारला.

मुंबई, पुणे, नाशिक यांसारखे बाधित भाग सोडले तर महाराष्ट्रात इतरत्र लॉकाउनचे निर्बंध १४ एप्रिलनंतर उठवण्यात यावेत अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र त्यांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळेच ही मागणी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारण लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. सरकारने केलेले दावे हे फक्त बातम्यांपुरतेच आहेत अशीही टीका त्यांनी केली. बऱ्याच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर द्राक्षे फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणूनच १४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातले निर्बंध उठवले जावेत असं राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Previous Post

भाजपाने संकटकाळी गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावी!

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण

कराडमध्ये मॉर्निग वॉक करणाऱ्या ८३ लोकांवर कारवाई

कराडमध्ये मॉर्निग वॉक करणाऱ्या ८३ लोकांवर कारवाई

प्रभाग ९६ मध्ये भाजपकडून समाजोपयोगी उपक्रमांची मांदियाळी

प्रभाग ९६ मध्ये भाजपकडून समाजोपयोगी उपक्रमांची मांदियाळी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com