नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहीवाशी भयभीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेरूळ पश्चिमेला प्रभाग ९६ च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व समाजसेवक गणेशदादा भगत यांनी आरोग्यविषयक उपक्रमांचा धडाका लावत स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाचे पडघम वाजू लागताच नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व समाजसेवक गणेशदादा भगत यांनी प्रभागातील जनतेमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करताना २५०० मास्कचे घराघरात जावून वाटप केले आणि जनतेला घरात बसण्याचा सल्ला दिला. याशिवाय प्रभागातील सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने धूरफवारणी केली. सोसायटीतील सदनिकाबाहेरील जागा, टेरेस, सोसायटीआवारातील सार्वजनिक जागा सर्वत्र धूरफवारणी करण्यात आली. आजही ज्या ज्या सोसायटीतून मागणी होत आहे, त्या त्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धूरफवारणी करण्याचे काम सुरुच आहे. याशिवाय परिसरातील १०० गरीब परिवाराला मोफत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम केले.
परिसरात कोणी आजारी पडल्यास कधी रूग्णवाहिकेतून तर कधी वेळ पडल्या स्वत:च्या वाहनातून रूग्णालयात घेवून जाण्याचे काम भगत परिवार करत आहे. अनेक परिवार गावी गेले असल्याने समाजसेवक गणेशदादा भगत, किसमत भगत, रवी भगत हे तीनही भाऊ याशिवाय रात्री-अपरात्री वाहनातून गस्त घालत असून कोठे चोर्या होणार नाही याची काळजी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व समाजसेवक गणेशदादा भगत हे सतत विविध उपक्रम व अभियान राबविताना जनतेला खर्या अर्थाने दिलासा देण्याचे काम करत आहेत.