नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाने निधन झालेल्या मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्याची मागणी सारसोळे गावचे भूमीपुत्र व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे,नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,नेरूळ पालिका विभाग अधिकारी संजय तायडे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.काही रूग्णांचे निधनही झाले आहे.कोरोनाबाबत सर्वसामान्य नवी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यातच नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचे मृतदेह एका विभागातील व अत्यंविधीसाठी पाठविले भलत्याच विभागात.हा प्रकार नेरूळ सेक्टर चार येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमध्ये तुर्भे येथे राहणाऱ्यादोन कोरोना रूग्णांने मृत झालेल्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी आणले असता मी तो प्रकार हाणून पाडला व संबंधित मृतदेह अंत्यविधीसाठी तुर्भे स्मशानभूमीत पाठवून दिले.आज कोरोनाबाबत भीतीचे वातावरण असल्याने इतर विभागातील मृतदेह आपल्या विभागात जाळण्यास त्या त्या भागातील स्थानिक हे विरोध करणारच.त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण होवून यातून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती मनोज मेहेर यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरस हा नवी मुंबईतूनच नाहीतर देशातून किमान दीड ते दोन वर्षे जाणार नसल्याची शक्यता देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाकडूनच व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीवरून वादाच्या घटना होण्याऐवजी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तातडीने निवासी परिसरापासून लांबवर कोरोनाने निधन झालेल्या मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी लवकरात लवकर बांधण्यात यावी.ही स्मशानभूमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर उभारण्याची मागणी मनोज मेहेर यांनी केली आहे.