नवी मुंबई : मैत्री फाऊंडेशन, नेरूळ यांच्या वतीने प्रभाग ९६ व ९७ मधील सफाई कामगारांना टॉमटोचे मोफत वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात मैत्री फाऊंडेशनकडून जनसेवेसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. नुकतेच त्यांनी महापालिकेच्या सफाई कामगारांना मोफत टॉमटोचे वाटप केले. नेरुळ पूर्व आणि पश्चिमेला आदिवासी व झोपडपट्टी परिसरात अडीच टन कलिंगडाचे मोफत वाटप केले. नेरूळ पोलिसांना सनिटायझर्स व मॉस्कचे वाटप केले.
नेरूळ नोडमध्ये सातत्याने सेक्टर ६, १०, १६,१८,२४, सानपाडा, कोपरखैराणे परिसरात मैत्री फांऊडेशनकडून अत्यल्प दरात भाज्या पुरविण्यात येत आहे. मैत्री फांऊडेशनच्या वतीने अक्षय काळे, आनंदा तुळसणकर, सुनील पाटील, विजय शेळके, करण संबन, मनीष नाक्ते, अमोल डांगे, नितीन पवार, दत्तात्रय फडतरे, प्रवीण खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.