• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2020

अमरावतीत हजारो कामगारांच्या पगारावर कुऱ्हाड

adminbyadmin
in Uncategorized
0
अमरावतीत हजारो कामगारांच्या पगारावर कुऱ्हाड

कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याच जिल्ह्यातील घटना

अमरावती : राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जिल्ह्यातच कामगारांवर पगार कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाऊनच्या काळात अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील रतन इंडिया या वीज निर्मिती प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी हजारो कामगारांची मोठी वेतन कपात केल्याचे समोर आले आहे. महत्वाची बाब म्हणजे, राज्याचे कामगार राज्यमंत्र्यांनाच कंपन्या जुमानत नसल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी कामगारांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू व जिल्हाधिकारी यांना निवेदन देवूनही काहीच तोडगा निघाला नसल्याच कामगारांचे म्हणणे आहे.

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये रतन इंडिया ही वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनी अंतर्गत अनेक छोट्या मोठ्या कंत्राटदार कंपन्या कामगारांना काम देत असतात. त्याचा त्यांना दरमहा मोबदला दिला जातो. लॉकडाऊनच्या काळात सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत या कंत्राटी कंपन्यांनी कामगारांना महिन्यातून पाच ते सहा दिवस कामावर बोलवले आणि तेवढ्याच दिवसांचे वेतन दिले. असे त्या कामगारांनी सांगितले. या प्रकरणी कामगारांनी कंपनी विरोधात पोलीस स्टेशन, पालकमंत्री यशोमती ठाकूर, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. पण यावर कुठलाच तोडगा निघाला नाही, असे कामगारांनी सांगितलं.

या कंपनीमध्ये काम करणारे सर्व कामगार हे ग्रामीण भागातील आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी कंपनीच्या आदेशाचे पालन करत जीवाची परवा न करता आपले काम केले. यानंतरही या कामगारांच्या वेतनात कंपन्यानी मोठी कपात केली. कामगारांना सद्य घडीला केवळ दोन ते पाच हजारांपर्यंत पगार दिला जात आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे सरकार पगार कपात करू नका असे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे कंपन्यानी आपली मनमानी सुरू केली आहे.

दरम्यान, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने कामगारांच्या पाठीशी राहत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. पण आता त्याच्याच जिल्ह्यातील कंपन्या बच्चू कडू यांना जुमानत नसल्याचे समोर आले. कामगारांची झालेली वेतन कपात यावर बच्चू कडू कंपन्यावर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous Post

वर्ध्यात शेतकऱ्यांचे ‘कापूस जाळा’ आंदोलन

Next Post

कांदा घसरला, शेतकऱ्यांचे थेट पंतप्रधान मोदींनाच साकडे

Next Post
कांदा घसरला, शेतकऱ्यांचे थेट पंतप्रधान मोदींनाच साकडे

कांदा घसरला, शेतकऱ्यांचे थेट पंतप्रधान मोदींनाच साकडे

तुर्भेत कोविड  विलागीकरण केंद्र, प्रतिबंधात्मक उपाय योजना करा  : अमित मेंढकर

तुर्भेत कोविड विलागीकरण केंद्र, प्रतिबंधात्मक उपाय योजना करा : अमित मेंढकर

मध्यप्रदेश, झारखंडकडे रवाना होणाऱ्या ३५०० नागरिकांना महापालिकेमार्फत फुड पॅकेट्सचे वितरण

मध्यप्रदेश, झारखंडकडे रवाना होणाऱ्या ३५०० नागरिकांना महापालिकेमार्फत फुड पॅकेट्सचे वितरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com