नवी मुंबई : नवी मुंबई महानगपालिका प्रभाग क्र. ६८, प्रभाग क्र. ६९, प्रभाग क्र. ७०, प्रभाग क्र.७१, प्रभाग क्र. ७३ तुर्भे परिसरात कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्याबाबत आणि तुर्भे परिसराकरिता स्वतंत्र कोव्हीड-१९ विलगिकरण केंद्र उभारण्याबाबत माजी नगरसेवक अमित अमृत मेढकर यांनी ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक आणि पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना लेखी निवेदन दिले आहे.
मागील काही दिवसापासून नवी मुंबई शहरातील तुर्भे स्टोअर, हनुमानगर इंदिरानगर, तुर्भेनाका, परिसरात मोठ्या संख्यने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. जवळपास ८० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असून त्या परिसरातील ६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तुर्भे परिसरात झोपडपट्टी परिसर मोठ्या प्रमाणात असल्याने त्या परिसरात दाटीवाटीने नागरिक वास्तव्यास आहेत. तेथील नागरिक नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात तसेच परिसरामध्ये घरोघरी पिण्याच्य पाण्याचे नळ घरोघरी नसल्यामुळे सार्वजनिक पाण्याच्या नळावर वारंवार गर्दी होते त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिसरातील नागरिकांना सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे लक्षात आल्यावर तुर्भे येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये नागरिक प्राथमिक उपचाराकरिता जातात परंतु त्याठिकाणी नागरिकांची योग्यप्रकारे तपासणी व उपचार केले जात नाहीत. तसेच ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळून येत आहे, त्यांच्या कुटुंबियांना होम
क्वारंटाईन केले जात आहे. परंतु झोपडपट्ट्यामधील घरात चारपेक्षा जास्त व्यक्ती राहत असल्याने तसेच स्वतंत्र शौचालयाची सुविधाउपलब्ध नसल्याने हो क्वारंटाईनच्या कोणत्याही नियमाचे पालन होत नाही, त्याकरिता अशा नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र असे विलगीकरण केंद्र उभारणे आवश्यक आहे तसेच ज्या कोरोना रुग्ण आढळून आले आहेत त्या परिसरातील त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे सॅम्पल घेऊन त्यांची कोव्हीड-१९ ची चाचणी करावी . महापालिकेने ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येतो अश्या ठिकाणी कंटेन्टमेंट झोन जाहीर केले आहेत परंतु तेथील नागिरकांना जीवनावश्यक वस्तू किराणामाल, दूध,भाजीपाला, गॅस सिलेंडर इत्यादीसाठी बाहेर पडावे लागत असल्याने महापालिकेने त्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचीसुविधा नसल्यामुळे कंटेन्टमेंट झोनच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे, त्याबाबत संबधीताना सूचना देऊनत्या परिसरात पोलीस यंत्रणा तैनात आवश्यकता आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.