नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील एसटीपी प्लान्ट स्वच्छ करण्याची मागणी नवी मुंबई भाजप युवती मोर्चाच्या अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नेरुळ सेक्टर २ येथे पालिकेचा एस टी पी प्लांट आहे. या प्लांटमधून स्थानिक रहीवाशांना दररोज दुर्गंधी करावी लागत असून प्लांट पूर्णपणे तुंबलेला (चोकअप) आहे. सिव्हरेज प्लांटसमोरच नागरी लोकवस्ती असून स्थानिक रहीवाशांना या त्रासास सामोरे जावे लागत आहे. तसेच पावसाळा आता अवघ्या चार-पाचर दिवसांवर आलेला असताना हा प्लांट स्वच्छ करणे गरजेचे आहे अन्यथा येत्या पावसाळ्यात सर्व सांडपाणी रस्त्यावर येऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाने नवी मुंबईत हाहाकार माजवलेला असताना मल:निसारण वाहिनी तुंबून पाणी रहिवाशी भागात येणे म्हणजे कोरोना तसेच साथीच्या इतर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तसेच या भागात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने मल:निसारण वाहिनी व हा प्लांट स्वच्छ करावा, अशी मागणी सुहासिनी नायडू यांनी केली आहे.