नवी मुंबई : कोरोना काळात गेल्या अडीच महिन्यात प्रभाग ९६ व ९७ मधील रहीवाशांची काळजी घेताना भाजपकडून सातत्याने विविध लोकोपयोगी कामाचा धडाका लावण्यात आला आहे. गरजूंना सतत धान्य वाटप, प्रभागात जंतुनाशक फवारणी, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सॅनिटायर्झसची फवारणी आदी कामे सुरू असतानाच रविवारी,( दि. ३१ मे ) पुन्हा प्रभाग ९६ व ९७ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यात आले. जनसेवक गणेशदादा भगत, भाजप नगरसेविका सौ. रूपालीताई किस्मत भगत, भाजपचे नेरूळ तालुका अध्यक्ष राजूशेठ तिकोणे व समाजसेविका उल्काताई तिकोणे यांच्या माध्यमातून दोन प्रभागातील रहीवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
कोरोना काळात रहीवाशांची काळजी घेताना भाजपकडून या दोन्ही प्रभागात सुरूवातीच्या काळात गरजूंना धान्य वितरीत करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील व अंर्तगत भागात सॅनिटायर्झसची फवारणी करण्यात आली. आजही जनसेवक गणेशदादा भगत व नगरसेविका सौ. रूपालीताई किस्मत भगत यांच्या माध्यमातून हे उपक्रम सुरूच आहे. कोरोनाचा मुक्काम नवी मुंबईत अजून काही काळ लांबणार असल्याचे पाहून जनसेवक गणेशदादा भगत, भाजप नगरसेविका सौ. रूपालीताई किस्मत भगत, भाजपचे नेरूळ तालुका अध्यक्ष राजूशेठ तिकोणे व समाजसेविका उल्काताई तिकोणे यांनी प्रभाग ९६ व ९७ मधील रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात स्थानिक जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी जे जे लागेल , ते सर्व पुरविण्यासाठी आम्ही तयार आहोत, जनतेने घराबाहेर पडू नये असे आवाहन करताना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झस हा उपक्रमही त्याच प्रयत्नाचा एक भाग असल्याची माहिती जनसेवक गणेशदादा भगत व भाजपचे नेरूळ तालुका अध्यक्ष राजूशेठ तिकोणे यांनी संयुक्तपणे दिली.
या वेळी समाजसेवक संजय सपकाळ,प्रमोद प्रभू,आशिष कदम,अशोक गांडाल,सत्यवान घाडी,सागर मोहिते.सूर्या पात्रा,विकास तिकोने,ऋषिकेश भुजबळ,विजय पाथारे,रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली.