नवी मुंबई : कोरोना काळात गेल्या अडीच महिन्यात प्रभाग ८७ मधील रहीवाशांची काळजी घेताना शिवसेना माजी नगरसेविका व शिवसेना उपशहरसंघठक सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्याकडून सातत्याने विविध लोकोपयोगी कामाचा धडाका लावण्यात आला आहे. गरजूंना धान्य वाटप, प्रभागात जंतुनाशक फवारणी, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सॅनिटायर्झसची फवारणी आदी कामे सुरू असतानाच गेल्या तीन दिवसापासून गृहनिर्माण सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यात येत आहे. शिवसेना माजी नगरसेविका व शिवसेना उपशहरसंघठक सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० मधील रहीवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
कोरोना काळात रहीवाशांची काळजी घेताना शिवसेना शाखा ८७च्या वतीने तसेच मांडवे परिवाराकडून रहीवाशांना त्यांच्या सोसायटी आवारातच भाज्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरील व अंर्तगत भागात सॅनिटायर्झसची फवारणी करण्यात आली. प्रभागात कोरोना रूग्ण आढळल्यास पुन्हा फवारणीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा, कोरोना रूग्णांची काळजी व त्यांच्या परिवाराची विचारपुस, रूग्णवाहिकेसाठी धावपळ मांडवे परिवाराकडून सतत करण्यात येत आहे.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला सोसायट्यांना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात स्थानिक जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी जे जे लागेल , ते सर्व पुरविण्यासाठी आम्ही तयार आहोत, जनतेने घराबाहेर पडू नये असे आवाहन करताना फूट स्टेपिंग सॅनिटायर्झस हा उपक्रमही त्याच प्रयत्नाचा एक भाग असल्याची माहिती शिवसेना माजी नगरसेविका व शिवसेना उपशहरसंघठक सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन मांडवे, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांनी संयुक्तपणे दिली.
या वेळी शरद पाजंरी, गौतम शिरवाळे, राजू प्रभू, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, उपशहरसंगठक व माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख रतन मांडवे तसेच स्थानिक गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी व रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.