निलेश मोरे
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि वाढत असलेला लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर यंदा अनेक मोठं मोठ्या गणेशोत्सव मंडळाने उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. घाटकोपरचा राजा असलेल्या सेनेटोरियमलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी निर्णय घेतला आहे.
यंदाची परिस्थिती पाहून यंदा १६ फुटी ऐवजी ४ फुटी गणेशमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मंडळ आगमन व विसर्जन मिरवणूक काढणार नाही व पेटीत जमा झालेली रक्कम कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडास देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कोठावदे यांनी सांगितले.