नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांनाच कायम ठेवावे, त्यांना या पदावरून न हटविण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूलगांधी यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांना कायम ठेवण्यासाठी आपणाला साकडे घालत असल्याचे निवेदनाच्या सुरूवातीलाच स्पष्ट करून रवींद्र सावंत पुढे म्हणाले की, गेल्या पाच-सहा दिवसापासून विधानसभा अध्यक्षपदावरून नाना पटोळे यांना हटविणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून काम करताना नाना पटोळेंनी विधानभवन कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय देताना त्यांची कामे मार्गी लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे करताना ते मंत्रालयीन पातळीवरून पक्षसंघटना वाढविण्याला व कार्यकर्त्याचा उत्साह वाढविण्याचे पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम केले आहे. कार्यकर्ता म्हणून नाना पटोळे यांच्याकडे गेल्यावर ते सर्वप्रथम पक्षातील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची कामे करत आहेत. त्यांनी आणलेली कामे करताना, समस्या सोडविताना संबंधित कामांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका आयोजित करून कामे करून दिली आहेत. स्वातंत्र्यानंतर नाना पटोळेंच्या माध्यमातून प्रथमच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना थेट विधानभवनात जाण्याची आणि विधानभवनाच्या माध्यमातून कामे होत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते व पदाधिकारी थेट विधानभवनात प्रवेश करतात, नानांच्या माध्यमातून कामे होतात, ते परत गावी गेले नाही तर त्यांच्या निवासाची व भोजनाची सोयही केली जाते. विधानभवनात नाना असल्यामुळे कामे होणार हा विश्वास आता ग्रामीण व शहरी भागातील काँग्र्रेस कार्यकर्त्यात निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने नानांनी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कामे करताना, समस्या सोडविताना त्यांच्याच दालनात बैठका घेतल्या आहेत. ते स्वत: या बैठकांना उपस्थित राहत असल्याने अधिकाऱ्यांवर दबाव येतो व कार्यकर्ते उत्साहीत होतात. नाना पटोळेंच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यात नवा उत्साह संचारला असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनातून राहूल गांधींच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
नाना पटोळे हे आणखी काही काळ विधानसभा अध्यक्षपदी राहणे पक्षसंघटनेसाठी व कार्यकर्त्यासाठी आवश्यक आहे. नाना पटोळे या पदावरून गेल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांची विधानभवनाच्या माध्यमातून कामे होणार नाही. पक्षसंघटनेसाठी ही बाब पोषक ठरणार नाही. त्यामुळे पक्षसंघटनेच्या व तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या हितासाठी नाना पटोळे यांना विधानसभा अध्यक्षपदी कायम ठेवावे, हे साकडे आम्ही आपणास घालत आहोत. त्यांच्या माध्यमातून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी कामगारांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनावर अकुंश ठेवला आहे. नवी मुंबई काँग्रेस पदाधिकार्यांची कामे मार्गी लागली आहे. नाना पटोळे हे अधिकाधिक काळ विधानसभा अध्यक्षपदी राहणे काँग्रेस पक्षासाठी आवश्यक आहे. आपण आमच्या निवेदनाचा विचार करून पक्षासाठी व काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी नाना पटोळेंना विधानसभा अध्यक्षपदी कायम ठेवावे असे साकडे रवींद्र सावंत यांनी राहूल गांधींना घातले आहे.
नाना पटोळे हे आमच्या भागातले नाहीत. मी पश्चिम महाराष्ट्रातला सातारा भागातील तर नाना पटोळे हे विदर्भातील आहेत. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता कामगार वर्गाच्या समस्या इंटकच्या माध्यमातून घेवून ज्या ज्यावेळी विधानभवनात गेलो, त्या त्या वेळी नानांनी मला न्याय मिळवून देताना पालिका प्रशासनाच्या बैठका विधानभवनात आयोजित केल्या. याशिवाय अधिवेशन काळात कार्यकर्त्यांची गैरसोय होवू नये म्हणून त्यांना पासेस उपलब्ध करून देण्याचे कार्य नाना करत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यानी कधीही फोन केला तर नाना स्वत: फोन उचलतात. नानांच्या माध्यमातून काँग्र्रेस कार्यकर्त्यांची विधानभवनाच्या माध्यमातून कामे होवू लागली आहेत. नानांचे या पदावर राहणे पक्षासाठी व कार्यकर्त्यासाठी गरज आहे. आपण सर्व बाबींचा विचार करून नानांना विधानसभा अध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी करताना रवींद्र सावंत यांनी राहूल गांधींना पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण हे करत असल्याचे सांगितले.