राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
पनवेल : कोविड
साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बजावणार्यांना कोविड रूग्णांना
महापालिका, नगर पालिका, नगर पंचायती आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी पुढील
पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या करांसह मालमत्ता कर माफ करावे, अशी मागणी करून
सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपून प्रशासनाला पत्रव्यवहार करून कोविड रूग्णांचे
प्रत्यक्षात मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे
अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.
पनवेल
महापालिका क्षेत्रातील शहरांमध्ये अथवा ग्रामीण भागातील रहिवाशी असलेल्या नागरिक
बांधव मुंबई महापालिका, पोलिस दल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, वर्स-विरार आदी
भागात शासनाच्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यांना कोणत्याच आस्थापनेने
फारशी व्यवस्था केलेली नसताना, ते कर्तव्यात कुठेही कसुर करत नाहीत. तरीही त्यांची
व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, असा विरोधी सूर लावून एकप्रकारे त्यांची हेटाळणीच
काही राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यातून त्यांचे आणि कुटूंबाचे खच्चीकरण होत आहे.
विशेष
म्हणजे पनवेल महापालिका क्षेत्रात राहणारे नागरिक इतर आस्थापनात कोविडमध्ये
अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच पनवेल महापालिका आणि इतर आस्थापनात सेवा करणारे
इतर महापालिका क्षेत्रात राहत आहेत. त्यांची इथे काहीच व्यवस्था काय केली गेली
नाही, मग इतरांकडे बोट दाखविण्याचे राजकारण कशासाठी खेळले जात आहे, असा प्रश्न
कडू यांनी उपस्थित केला आहे.
वास्तविक
ते शहरातील रहिवाशी असून त्यांनी कर्ज काढून घरे घेतली आहेत. ते सोसायटीचे विविध
करही देत आहेत. शिवाय महापालिका, ग्रामपंचायतीला कर भरत आहेत. त्याबदल्यात त्यांना
आजच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतीच विशेष मदत केलेली नाही. अशा स्थितीत
त्यांच्यासोबत राहण्याऐवजी त्यांना एकप्रकारे कट कारस्थानाच्या व्युहरचनेद्वारे
बाहेर काढण्याचे उपद्व्याप काही राजकीय नेते करीत आहेत. अशा परिस्थिीत सामाजिक
कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी अत्यावश्यक सेवेतील कोविड योद्ध्यांचे मनोबळ वाढून
त्यांना आत्मसन्मान मिळावा म्हणून महापालिका, ग्रामपंचायतीने पाच वर्षाचे मालमत्ता
कर माफ करण्याची मागणी केली आहे.
शिवाय
समाजातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करून प्रशासनाशी
यामागणीसदर्भात पत्रव्यवहार करून कोविड योद्ध्यांची सेवा करण्याची विनंती केली आहे.
विशेष
म्हणजे पनवेल महापालिका क्षेत्रात राहणारे नागरिक इतर आस्थापनात कोविडमध्ये
अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच पनवेल महापालिका आणि इतर आस्थापनात सेवा करणारे
इतर महापालिका क्षेत्रात राहत आहेत. त्यांची इथे काहीच व्यवस्था काय केली गेली
नाही, मग इतरांकडे बोट दाखविण्याचे राजकारण कशासाठी खेळले जात आहे, असा प्रश्न
कडू यांनी उपस्थित केला आहे.