नवी मुंबई : कोरोना रूग्णांची सानपाडा कॉलनीमध्ये व सानपाडा पामबीच परिसरात संख्या वाढत चालल्याने सानपाडा परिसरात कोव्हिड-१९ मास स्क्रिनिंग कॅम्प तातडीने राबविण्याची मागणी प्रभाग ७६ मधील भाजप कार्यकर्ते व समाजसेवक पाडूंरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा परिसर तसेच सानपाडा पामबीच परिसरात कोरोना रूग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे. कोरोनाबाबत सानपाडा कॉलनी विभागात तसेच पामबीच भागातील रहीवाशांमध्ये रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना आजाराएवजी त्याच्या भीतीनेच सानपाडा कॉलनी विभागात तसेच पामबीच भागातील रहीवाशी भयभीत झाले आहेत. कोपरखैरणे व अन्य परिसरात महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प धर्तीवर सानपाडा कॉलनी विभागात तसेच पामबीच भागात लवकरात लवकर राबविण्यात यावे अशी मागणी पाडूंरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.