नवी मुंबई : कॉंग्रेस पक्षाला सतत आपल्या कार्यातून नवसंजीवनी देण्याचे कार्य करणारे रवींद्र सावंत यांची शनिवारी, दि. ६ जून रोजी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल कौशिक यांनी निवड जाहीर केली आहे.
रवींद्र सावंत आणि नवी मुंबई कॉंग्रेस हा एकत्रित शब्द नवी मुंबई कार्यक्षेत्रापुरताच मर्यादीत राहीला नसून मंत्रालयीन पातळीपर्यत ही ओळख पोहोचलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्यापासून कॉंग्रेसचे आताचे आमदार व माजी आमदार रवींद्र सावंत यांना नवी मुंबई कॉंग्रेस म्हणूनच ओळखतात. कॉग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय व सामाजिक कामाचा श्रीगणेशा गिरविणारे रवींद्र सावंत आज नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. नवी मुंबई इंटक अध्यक्षपदाची धुराही ते सांभाळत आहेत. इंटकच्या अध्यक्षपदाला न्याय देताना त्यांनी एमआयडीसीतील तसेच नवी मुंबई महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविल्या आहेत.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी रवींद्र सावंत यांची झालेली निवड ही कॉंग्रेससाठी नवी मुंबईत नवसंजीवनी मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावेल असे बोलले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे कामगार वर्ग सुखावला असला तरी रवींद्र सावंत यांची पत्रकारांशी असलेली जवळीक जगजाहीर असल्याने अनेक प्रस्थापितांच्या पोटात भीतीने गोळा उठल्याचे बोलले जात आहे.
रवींद्र सावंत यांच्या संघटनात्मक कार्यावर, कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार व नवी मुंबईचे निरिक्षक मोहन जोशी जवळून पाहत असल्याने त्यांनी रवींद्र सावंत यांना नवी मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्तेपद देण्याची शिफारस केली व जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल कौशिक यांनी त्यानुसार सावंत यांची प्रवक्तेपदी निवड केली.