जोरदार झालेल्या वाऱ्यामुळे नवी
मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची तसेच झाडांच्या फांद्यांची पडझड झाली. पण पडलेली झाडे
व फांद्या हटविण्यासाठी महापालिका प्रशासन व अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांची वाट न
पाहता प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत व त्यांचा परिवार कार्यकर्त्यासह रस्त्यावर
उतरला आणि पडझडीतले अडथळे दूर करत रस्त्यावरील कोंडी हटविल्याने नेरूळ पश्चिममधील
रहीवाशांनी जवळून पाहिले.
बुधवार, दि. ३ जुन रोजी झालेल्या जोरदार
पाऊस व वाऱ्यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये अनेक ठिकाणी झाडे झाडांच्या फांद्या
पदपथावर व रस्त्यावर ऊभ्या असलेल्या गाड्यावर पडल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका
सौ.रुपाली किस्मत भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि उद्यान विभागास
फोन करून सदर ठिकाणावरील पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याच्या सूचना केल्या,फायरब्रिगेड
अधिकारी वर्गाने तत्परतेने नेरुळ सेक्टर-१८ येथील सागरदर्शन टॉवर पदपथालगत उभ्या असलेल्या
टॅक्सीवर पडलेली झाडांची फांदी,नेरुळ सेक्टर-१६ येथील श्री विनायक सोसयटी लगत उभ्या
असलेल्या वॅग्नर गाडीवर पडलेली झाडांची फांदी, अवधूत सोसायटी मध्ये साई मंदिरावर पडलेली
झाडांची फांदी कटिंग करून बाजूला केल्या.
थोड्या वेळात पुन्हा पाऊस व वाऱ्यामुळे
सेक्टर-१६ श्री सागर दर्शन सोसायटी आणि सेक्टर-१८ जयभवानी सोसायटी समोरील पदपथ लगत
उभ्या असलेल्या गाड्यांवर झाडांच्या फांद्या पडल्या तसेच सेक्टर १६ए आनंद विहार सोसायटी
मध्ये मोठे झाड पडले, फायर ब्रिगेड ला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी कामात व्यस्त
असल्याने नगरसेविका रुपाली किस्मत भगत आणि
जनसेवक गणेशदादा भगत यांनी आपले सहकारी वर्गास सूचना करून सदर झाडे व झाडांच्या फांद्या
बाजूला करण्याची विंनती केली. मिळालेल्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भगत,
विकास तिकोने, अशोक गांडाल, सागर मोहिते,
संग्राम चव्हाण, राजेंद्र तुरे, राजेश घाडी, सत्यवान घाडी, संजय पिंगळे, कुणाल भालेराव,
विजय संसारे, विजय पिंगळे, सूर्या पात्रा यांनी स्वतः कोयता आणि कुऱ्हाडीच्या मदतीने
सदर ठिकाणावरील पडलेल्या हाडांच्या फांद्या छाटून बाजूला केल्या. या कामगिरीबद्दल स्थानिक
नागरिकांनी जनसेवक गणेशदादा भगत, नगरसेविका रुपाली किस्मत भगत, आणि त्यांच्या सर्व
सहकारी वर्गाचे आभार मानले.