नवी मुंबई : कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये कोव्हिड-१९ मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्याची मागणी सारसोळे गावातील समाजसेवक मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात कोरोना रूग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्याचे आपणास माहिती आहेच. कालही आमच्या नेरूळ सेक्टर सहा परिसरात कोरोनाचे तीन रूग्ण आढळले आहेत. महापालिकेने प्रसिध्दीपत्रकात तसे नमूदही केले आहे. कोरोनाबाबत सारसोळेच्या ग्रामस्थांत आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यांवर आजतागायत जंतुनाशक फवारणी केलेली नाही. कोरोना आजाराएवजी त्याच्या भीतीनेच सारसोळे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी भयभीत झाले आहेत. कोपरखैरणे व अन्य परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात लवकरात लवकर राबविण्याची मागणी सारसोळे गावातील समाजसेवक मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.