
भास्कर गायकवाड
नवी मुंबई : महापालिका प्रशासन आणि तेरणा रूग्णालयाच्या वतीने जुईनगर सेक्टर २३ येथे ‘कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुईनगरवासियांसाठी या शिबिरासह आरोग्य शिबिराचे आयोजन करावे यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी २७ मेपासून पालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनातून तसेच प्रत्यक्ष भेटीतून सतत पाठपुरावा केलेला आहे.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी जुईनगर नोडमध्ये कोरोनाचे वाढते रूग्ण पाहून या परिसरात ‘कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग’ शिबिराचे आयोजन करण्यात यावे तसेच परिसरात वैद्यकीय सुविधांचा दुष्काळ, डॉक्टरांची अनुपस्थि,उपस्थित डॉक्टरांची कमी वेळेतच उपलब्धता या पार्श्वभूमीवर जुईनगरवासियांच्या आरोग्य रक्षणासाठी महापालिकेने आरोग्य शिबिराचे लवकरात लवकर आयोजन करावे यासाठी महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभाग, वैद्यकिय अधिकारी, संबंधित विभागाचे पालिका उपायुक्त यांच्या सतत भेटीगाठी घेवून संबंधितांच्या नजरेस समस्येचे गांभीर्य आणून दिले.
रवींद्र सावंत यांच्या लेखी निवेदनाच्या व प्रत्यक्ष भेटी घेवून केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तेरणा रूग्णालयासोबत संयुक्तपणे जुईनगरवासियांसाठी ‘कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग’ शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जुन रोजी जुईनगर सेक्टर २३ परिसरात ‘कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग’ शाळा क्रं १७ मध्ये सकाळी १० ते ५ या वेळेत हे ‘कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग’ शिबिर संपन्न होणार आहे. जुईनगरवासियांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केले आहे.