नवी मुंबईकर भीतीच्या सावटाखाली, सर्वत्र कोरोनाचीच चर्चा
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच १३ जूनचा शनिवार पुन्हा एकवार नवी मुंबईकरांची चिंता वाढविणारा ठरला. कोरोनाग्रस्तांचा आलेख दोनशेजवळ स्थिरावत चालल्याने नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आता उघडपणे भीतीचे सावट दिसू लागले आहे. कोरोनाचे नवी मुंबईत तांडव सुरूच असल्याने सर्वत्र सध्या कोरोनाचीच चर्चा होताना पहावयास मिळत आहे.
१३ जूनचा शनिवार हा नवी मुंबईत कोरोना चर्चेचाच वार ठरला. शनिवारी महापालिका प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १९१ कोरोना रूग्ण नवी मुंबई शहरात आढळले आहेत. दोनच दिवसापूर्वी हाच कोरोनाग्रस्तांचा आकडा १९६वर गेला होता. तत्पूर्वी शंभरच्या जवळपास असणाऱ्या आकडेवारीने सुरूवातीला शंभर व त्यानंतर दीडशेचाही आकडा ओंलाडल्याने आता नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर कोरोना भयाचा प्रभाव दिसू लागला आहे.
आज आढळलेल्या १९१ कोरोना रूग्णांमध्ये बेलापूर विभागात १७, नेरुळ विभागात ४१, वाशी विभागात ११, तुर्भे विभागात २४, कोपरखैराणे विभागात २१, घणसोली विभागात १८, ऐरोली विभागात कोरोनाचे ४६तर दिघा विभागात १३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित १९१ रुग्ण आढळले असून नवी मुंबईत १४, ७६८ जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३७३४ आढळले असतानाच तपासणीत एकूण निगेटिव्ह रुग्ण १०६१२ निघाले आहेत. ४२२ तपासणी अहवाल प्रलंबित १३ जून रोजी बरे होऊन घरी ६२ व्यक्ति परतल्या आहेत. एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्तीची संख्या २१८६ आहे.