जनसेवक गणेश भगत यांनी स्वत: घेतला फवारणीत पुढाकार
नवी मुंबई : पावसाळ्याच्या कालावधीत साथीच्या आजाराचा उद्रेक लक्षात घेवून प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांनी स्वखर्चाने धूरफवारणीस प्रारंभ केला आहे. धूरफवारणी करण्यात जनसेवक गणेश भगत स्वत: आघाडीवर राहून फवारणी मशिन घेवून सोसायट्याच्या आवारात फवारणी केल्याने लोकांमध्ये गणेश भगत यांचीच चर्चा होत आहे.
प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि सेक्टर १८ परिसराचा समावेश होत आहे. या भागात सिडको सोसायट्या आणि रो-हाऊसेसचा समावेश होत आहे. येथील सदनिकाधारक मध्य व अल्प उत्पन्नधारक गटातील रहीवाशी राहतात.
पावसाळ्यात ताप, हिवताप, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीचे आजार सुरू होतात. त्या पार्श्वभूमीवर प्रभागातील रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील सेक्टर-१६ए, १६,आणि १८ परिसरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक मा.नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांच्या स्वखर्चाने मोफत धुर फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी, (दि. १९ जून) सेक्टर-१८ मधील
जय भवानी सोसायटी, मंगलमूर्ति सोसायटी, अजिंक्यतारा सोसायटी, बालाजी सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, गंगोत्री सोसायटीमध्ये अंतर्गत धुर फवारणी करण्यात आली. शनिवारी (दि.२० जून) रोजी नेरूळ सेक्टर १६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनसेवक गणेश भगत यांनी फवारणी करून घेतली. या उपक्रमा बद्दल स्थानिक रहिवाशांनी स्थानिक मा. नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांचे विशेष कौतुक केले.
प्रभागातील सर्व सोसायटी व रो-हाउस परिसरात टप्या टप्याने मोफत धुर फवारणी सुरु राहणार असल्याचे जनसेवक गणेशदादा भगत यांनी सांगितले. सदर कामी विकास तिकोने, सागर माहिते, अशोक गांडाल, राजेंद्र तुरे, रविंद्र भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.