नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४ परिसरातील रहीवाशांकरीता नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते, नवी मुंबई इंटक अध्यक्ष, नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोरोना पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर चार येथील महापालिका शाळेत सोमवार, (दि. २२ जून) कोविड १९ मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर २ येथील शिरवणे विद्यालय येथे हे शिबिर नेरूळ सेक्टर २ आणि ४ परिसरातील रहीवाशांकरीता आयोजित करावे यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते, नवी मुंबई इंटक अध्यक्ष, नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाकडे सतत लेखी पाठपुरावा केला होता. नवी मुंबई कॉंग्रेस सचिव विद्या भांडेकर यांनीही सावंत यांच्या जोडीला पाठपुरावा केला होता. अधिकाऱ्यांच्या सतत भेटीगाठीही घेतल्या होत्या.
नेरूळ आणि जुईनगर परिसरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून हे शिबिर राबवावे अशी मागणी करत कोरोनाच्या विळख्यात नेरूळ व जुईनगर नोड परिसर अडकत चालल्याचे रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिले होते.
कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण पाहता प्रभाग ८४ मधील नेरूळ सेक्टर दोन व चारच्या रहीवाशांना दिलासा देण्यासाठी कोविड १९ मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यासाठीच्या रवींद्र सावंतच्या परिश्रमाची दखल घेत महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर २ मधील शिरवणे विद्यालय सोमवार, दि. २२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कोव्हिड -१९, मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नागरिकांसाठी महत्वाचे असल्याने प्रभाग ८४ मधील नेरूळ सेक्टर दोन व चारमधील रहीवाशांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते, नवी मुंबई इंटक अध्यक्ष, नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी केले आहे.