भास्कर गायकवाड
नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ परिसरात बुधवार, दि. २४ जुन रोजी मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक व शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी परिसरामधील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महापालिका प्रशासनाकडे सतत लेखी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत भेटी घेवून पाठपुरावा केला होता.
नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयात या मास स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी येताना रहीवाशांनी सोबत आधार कार्ड घेवून व तोंडावर मॉस्क लावून यावे असे आवाहन शिवसेना विभाप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी केले आहे.
परिसरात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहे. प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० परिसरातील रहीवाशांत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची अनामिक भीती दूर होण्यासाठी हे मास स्क्रिनिंग शिबिरात तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होवून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन रतन मांडवे यांनी केले आहे.