भास्कर गायकवाड : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, एलआयी परिसरातील नादुरूस्त मल:निस्सारण वाहिन्यांची महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरूस्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे या मल:निस्सारण वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी लेखी निवेदनातून तसेच संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून पाठपुरावा केला होता.
नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी परिसर हा पूर्णपणे श्रमिकांचा व अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांचा परिसर. या ठिकाणी मल:निस्सारण वाहिन्या टाकतानाच सदोष टाकल्याचे नवी मुंबई नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिले होते. या मल:निस्सारण वाहिन्यात सतत चोकअप होत असल्याने या ठिकाणी नेहमी मला:चे पाणी वाहत असते, लोकांना दुर्गंधीचा सामना करत ये-जा करावी लागत असे. यामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी ही समस्या सतत निवेदनातू तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनीही एलआयजीतील समस्येबाबत सतत पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेरिला विद्या भांडेकर व रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्याची दखल घेत पालिका प्रशासनाने एलआयजीमधील मल:निस्सारण वाहिन्यांच्या झाकणांची दुरूस्ती केली. पालिका कर्मचारी हे काम करण्यासाठी आले असताना विद्या भांडेकर यांच्यासह नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सहसचिव शेवंता मोरे, सारिका धोंडे, शारदा घोडेकर, पुजारी, बागडे, कोडग आदी उपस्थित होते.