भास्कर गायकवाड
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील नेरूळ नोडमधील प्रभाग ८६ मध्ये मंगळवारी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मास स्क्रिनिंग कॅम्प उत्साहात पार पडले होते. प्रभाग ८६ मधील भाजप कार्यकर्ते मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग उपायुक्त, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री या सर्वाकडे पाठपुरावा केला होता. बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनीही पालिका प्रशासनाला प्रभाग ८४,८६ व ९६ मध्ये कॅम्प घेण्याविषयी लेखी पत्रातून निर्देशही दिले होते.
प्रभाग ८६ मधील सारसोळे गावच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी या कॅम्पमध्ये सहभागी होत आपली चाचणी करून घेतली. या कॅम्पच्या माध्यमातून ग्रामस्थांना व रहीवाशांना दिलासा मिळाला. भाजप कार्यकर्ते मनोज मेहेर हे सुरूवातीपासून कॅम्पमध्ये येणाऱ्या रहीवाशांची विचारपुस करत त्यांना मार्गदर्शन करत होते. प्रभाग ८६ मध्ये हा कॅम्प आयोजित करण्यात योदान दिल्याबद्दल सारसोळेचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजप कार्यकर्ते मनोज मेहेर यांना धन्यवाद देत आहे. अन्य पक्षाच्या काही राजकारण्यांनी मात्र कॅम्पसाठी काहीही पाठपुरावा न करता सोशल मिडियाच्या माध्यमातून केलेल्या चमकेशगिरीच्या प्रकाराबाबत ग्रामस्थ व रहीवाशी संताप व्यक्त करू लागले आहे. भाजपच्या मनोज मेहेरसारखा कोणत्याही कामाचा पाठपुरावा अगोदर करा व मग चमकेशगिरी करा असा टोमणा आता उघडपणे चर्चेदरम्यान ऐकावयास मिळू लागला आहे. विशेष म्हणजे कॅम्प आयोजनासाठी पाठपुरावा करून, कॅम्पच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवूनही मनोज मेहेर फोटो काढत नसल्याचे पाहून मनोज मेहेरची कामे बोलतात तर चमकेश लोकांना फोटोसेशन करावी लागत असल्याची टीका आता सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांकडून उघडपणे केली जात आहे.