नवी मुंबई : कोपरखैराणे,
प्रभाग ४२ मधील सेक्टर १६, १७, २२, २३ परिसरात मूषक नियत्रंण मोहीम राबविण्याची लेखी
मागणी भाजप कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त
अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील सेक्टर १६, १७, २२, २३ परिसरात उंदरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक भागातील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोरोनाच्या संकटातून अजून कोपरखैराणेवासियांची सुटका झालेली नाही. त्यात उंदरामुळे लेप्टोस्पायरोसिसचाही उद्रेक होण्याची भीती आहे. आज सकाळी सेक्टर १६ मधील संजय करंडे या रहीवाशांनी आमच्याकडे मूषक त्रासाबाबत तक्रार केली आहे. उंदरांनी विद्युत केबल्स कुरतडल्या तरी स्फोट होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर प्रभागात मोठ्या प्रमाणावर मूषक नियत्रंण मोहीम राबविण्याची मागणी भाजप कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.