नवी मुंबई : वाऱ्यामुळे नेरूळ सेक्टर १६ मधील बसथांब्याचा अर्धा भाग तुटल्याने पदपथावरील रहीवाशी व रस्त्यावरील वाहनांना त्रास होवू नये तसेच अपघात टळावा यासाठी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे करताच अवघ्या काही तासातच या बसथांब्याची दुरस्ती झाली. बुधवारी (दि. ८ जुलै रोजी) ही घटना घडली.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ येथील सीब्रीज सोसायटीलगतच्या पदपथावर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा थांबा आहे. तीन दिवसापूर्वी हा बसथांबा तुटून अर्धा तुटलेल्या अवस्थेत आला. पदपथावर अर्ध्या लोंबकळत असलेल्या या बसथांब्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना तसेच पदपथावरून जाणाऱ्या रहीवाशांना वारावादळात धोका आहे. यामुळे जिवितहानीचीही भीती आहे. ही बाब जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून निदर्शनास आणून दिली. निवेदनासोबत तुटलेल्या बसथांब्याचे छायाचित्रही गणेश भगत यांनी सादर केले. आयुक्तांना समस्येचे गांभीर्य ओळखत अवघ्या काही मिनिटातच संबंधितांना बसथांब्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी ज्या विभागाला आदेश दिले, त्या विभागाला गणेश भगत यांनी तात्काळ दुसरे निवेदन छायाचित्र जोडत सादर केले आणि त्यानंतर अवघ्या दोन तासातच गणेश भगत यांच्या पाठपुराव्यामुळे तुटलेल्या बसथांब्याची दुरूस्ती झाल्याचे प्रभाग ९६ मधील स्थानिक रहीवाशांना जवळून पहावयास मिळाले.